…अन् सकाळची हवा खाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या लातूरकरांना चक्क पोलिस ठाण्याची हवा खावी लागली !

प्रदीप मुरमे : लाॕक डाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये असे पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही माॕर्निग वाॕकसाठी घरा बाहेर पडलेल्या १२९ जणांच्या विरोधात धडक कारवाई करुन लातूर पोलिसांनी अखेर आपला पोलिसी खाक्या दाखविला.पोलिसांच्या या कारवाईने माॕर्निग वाँकच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री विविध उपाययोजना करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणजे लाॕक डाऊन होय.या लाॕक डाऊनच्या काळात रस्त्यावर कोणीही फिरणार नाही यासाठी पोलिस प्रशासन लोकांवर करडी नजर ठेवून आहे.लोकांनी रस्त्यावर फिरु नये असे पोलिसांनी अवाहन करुनही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे.अशा महाभागांना धडा शिकविण्यासाठी २ एप्रिल रोजी सकाळी ६ च्या सुमारास माॕर्निग वाॕकसाठी रस्त्यावर फिरणा-यांच्या विरोधात धरपकड मोहिम राबवून अशांना ताब्यात घेण्यात आले तर काहींनी यावेळी धूम ठोकली.केवळ ताब्यातच घेण्यात आले नाही तर १२०जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिस ठाण्याची हवा दाखविण्यात आली. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशावरुन पोलिसांनी हि कारवाई केली आहे.शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या उपस्थितीमध्ये मी पुन्हा विनाकारण घराबाहेर पडणार नाही अशी शपथ या १२० जणांना देण्यात आली. यात अंबाजोगाई रोड,बार्शी रोड,औसा रोड,रिंग रोड भागातील नागरीकांचा समावेश आहे.

या कारवाई दरम्यान सकाळपासून जो माणूस रस्त्यावर आला त्यास शिवाजी नगर येथील पोलिस ठाण्यात आणण्यात येत होते.पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्त्यावर फिरणा-यांना चांगलाच धडा बसला आहे तर अनेकांना माॕर्निग वाँक भलतेच महागात पडले आहे.एकुणच या कारवाईचे शहरातील जाणकारांनी स्वागत केले. आतातरी नागरीक घराबाहेर पडणार नाहीत अशी चर्चा या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोकांमधून ऐकावयास येत आहे,हे मात्र निश्चित!