fbpx

हुल्लडबाजी करणाऱ्या ८४ जणांना ताब्यात घेत पोलिसांची धुलवड

पुणे : सार्वजनिक रस्त्यांवर हुल्लडबाजी करत धुलवड खेळून नागरिकांना त्रास देणाऱ्या तब्ब्ल ८४ जणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळवडी निमित्त सार्वजनिक रस्त्यावर तसेच चौकामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकावरती रंग टाकणाऱ्या, महिलांच्या अंगावरती रंगाचे फुगे टाकणाऱ्या तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या ८४ जणांना आज ताब्यात घेण्यात आलेले आहे.

आज धुळवडीचा बंदोबस्त असल्याने हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार वाकड पोलीस स्टेशन कडील 9 टीम त्यामध्ये ७ अधिकारी ७५ कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले होते सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवरती व महिलांवरती रंग टाकणार्या तसेच वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या ८४ जणाना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे त्यांच्यावर ती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आणखी संध्याकाळपर्यंत अशीच कारवाई चालू ठेवण्यात येणार आहे.

1 Comment

Click here to post a comment