fbpx

मोदीं विरोधात सोशल मीडियावर लिहिल्याने पोलिसाला गमवावी लागली नौकरी 

narendra modi narendra modi likely-to-go-for-cabinet-expansion
अहमदनगर : सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. यामुळे पोलिसांकडून अनेकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. मात्र आज एक धक्कादायक अशी घटना घडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचे निलंबन करण्यात आलं आहे.
 काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक  असणारे रमेश शिंदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.  रमेश शिंदे यांनी मोदीं विरोधातील पोस्ट व्हॉट्सअॅपवरुन अनेक ग्रुपमध्ये पाठवली होती. दरम्यान या विरोधात तक्रार करण्यात आली होती.

1 Comment

Click here to post a comment