मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कणकवली पोलिसांनी (Kankawli Police) नितेश राणेंना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र नितेश राणे हजर झाले नाहीत, त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा राणे कुटुंबीय चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या परिस्थितीवरच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांनी कारवाई करताना नारायण राणे हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत याचं भान ठेवावं. महाविकास आघाडी सरकार नियोजनबद्धरित्या राणेंना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला आहे. पोलीस कुणाचे खासगी नोकर नाहीत. त्यांनी नारायण राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत याचं भान ठेवण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
#सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पूर्णपणे भाजपला बहुमत मिळेल अशाप्रकारचे चित्र आहे. केवळ आपल्या हातून जिल्हा बँक जाते या एका कारणास्तव @NiteshNRane यांना अडकवायच आणि सुडबुद्धीने अटकेची कारवाई करुन जिल्हा बँक वाचवायची असा केविलवाणा प्रयत्न सरकार करत आहे.#MVA pic.twitter.com/7kbQQe34Mv
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 29, 2021
कायद्यासमोर सर्वजण समान असले तरी केंद्रीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून काही विशेष अधिकार आहेत. त्यामुळं नारायण राणेंवर पोलीस कारवाई करताना काही प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतू कायदे-कानून, नियम-नीती सर्वकाही गुंडाळून आम्हाला राणेंवर कारवाई करायचीच आहे, अशी सरकारची भूमिका आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पूर्णपणे भाजपला बहुमत मिळेल अशाप्रकारचे चित्र असल्यामुळे केवळ आपल्या हातून जिल्हा बँक जाते या एका कारणास्तव नितेश राणे यांना अडकवायचे आणि सुडबुद्धीने अटकेची कारवाई करुन जिल्हा बँक वाचवायची असा केविलवाणा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- क्विंटन डी कॉक खेळणार नाही पुढील दोन कसोटी सामने; ‘हे’ आहे कारण
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम