fbpx

राज ठाकरेंची उद्या होणार चौकशी, पोलिसांनी घेतली खबरदारी मनसे कार्यकर्त्यांना धाडली नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे मंगळवारी राज ठाकरे यांना ईडीने चौकशीची नोटीस धाडली होती. राज ठाकरे यांना धाडलेल्या नोटीसमुळे मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तसेच उद्या मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली आहे. आता पर्यंत 20 ते 25 कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तरी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. तरीही उद्या मनसे कार्यकर्ते रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ठराविक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. तर खबरदारी घेतली आहे. 20 ते 25 कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर रात्री पर्यंत या अनेक कार्यकर्त्यांना नोटीस जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. तर तर राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगी उद्धव ठाकरे भावाची पाठराखण करताना दिसत आहेत.