… तर पोलीस करणार मोबाईल जप्त

डेहराडून : उत्तराखंडमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल आता किमान एक दिवसासाठी तरी जप्त होणार आहेत. तसे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. हा आदेश देताना कोर्टाने म्हंटले आहे की, वाहन चालवताना फोनवर बोलणारे स्वताच्या जीवाबरोबरच इतरांचा जीव देखील धोक्यात घालतात.

त्यामुळे अशा वाहन चालकांकडून ५ हजार रुपये दंड आणि त्यांचा मोबाईल जप्त करण्यात यावा असं हायकोर्टाने म्हंटले आहे. तसेच राज्य सरकारने एक महिन्याच्या आत राज्यातील सर्व रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करावे, असे हायकोर्टाने सांगितले असून, राज्यात प्रत्येक तहसील कार्यालयात एक पथक नेमावे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे काम हे पथक करणार आहे.

तसेच मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने पोलिसांना आवश्यक ते साहित्य पुरवावे असा आदेशही उत्तराखंड सरकारला कोर्टाने दिला आहेत. उत्तराखंड हायकोर्टाचे न्या. राजीव शर्मा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

रायगड फोटोसेशन; अखेर विश्वास पाटलांनी मागितली माफी