भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त

डोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला होतो, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. धनंजय कुलकर्णी भाजपाचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत.

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 1 एयरगन, 10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुर्‍हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकर्‍या, मोबाईल, काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार 20 रूपये किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला.

हा दुकानदार गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शस्त्रे विक्री करत असल्याचा क्राईम ब्रँचला संशय आहे. या दुकानदाराने गुंड- गुन्हेगारांना किती शस्त्रांची विक्री केली, त्या दिशेने देखील चौकशी क्राईम ब्रँच करत आहे.

पालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

पालघर बॉम्ब साठा प्रकरण; मुंबई, पुणे,सोलापूरमध्ये घातपात घडवण्याचा आरोपींचा कट

खाजगी संस्थाचालकाच्या अपहरण प्रकरणी काँग्रेस नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा,

बाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा

संकेत जायभाये आणखी चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश