पाथरीत जीममधून पोलिसांनी केले पिस्टल जप्त

परभणी : पाथरी येथील एकता नगरामधील एका जीममधून पोलिसांच्या एका पथकाने सिल्व्हर रंगाची पिस्टल जप्त केले आहे.
मंगळवारी परभणी शहरातून दोन पिस्टल तर त्यापाठोपाठ पाथरीतून अवघ्या काही तासातच आणखी एक पिस्टल जप्त केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. पोलिसांचे एक पथक पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी त्या पथकास मिळालेल्या गुप्त माहिती नुसार सय्यद चाऊस महंमद चाऊस (रा. अजीज मोहल्ला, पाथरी) हा व्यक्ती विनापरवाना आणि बेकायशीरपणे पिस्टल बाळगून असल्याचे समजले.पाठोपाठ या पथकाने बुधवारी पहाटे पाच वाजता चाऊस याच्या घरावर छापा टाकला. त्या 26 वर्षीय युवकास ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा त्याने एकात नगरातील त्याच्या मालकीच्या जीममध्ये पिस्टल ठेवल्याची माहिती या वेळी दिली. पथकाने तातडीने जीममध्ये जात तेथील सिल्व्हर रंगाचे पिस्टल जप्त केले.

दरम्यान पथकाने केलेल्या चौकशीतून त्याने ते पिस्टल परभणीतून एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले. या प्रकरणी त्यासह अन्य एका व्यक्तीवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 40 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त केले आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड, अजहर पटेल, संतोष सानप, विष्णू भिसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या :