बाबा राम रहीम आत्मघातकी पथके तयार करत असल्याची पोलिसांची माहिती

नवी दिल्ली : बाबा राम रहीम आत्मघातकी पथके तयार करत असल्याची माहिती पोलिसांना डेराच्या आश्रमातून मिळालेल्या कागदपत्रातून मिळाली आहे. आपल्यावरील खटल्याप्रकरणी तपास सुरू असताना दबाव टाकण्याच्या हेतूने तो हे कृत्य करत असल्याचे सांगितले जात आहे.

राम रहीमचा अनुयायी इंदू इंसान याने २० ऑक्टोबर २००५ रोजी डेराला एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यातून ही माहिती पुढे आली.

माझे जीवन मानवतेसाठी समर्पित आहे. डेरा सच्चाकडून मला त्यासाठी कायम प्रोत्साहन मिळाले. माझ्या मरणाला इतर कोणी नाही, तर मीच जबाबदार असेल. माझ्या मृत्युला डेराला जबाबदार धरण्याचा माझ्या कुटुंबीयांनाही अधिकार राहणार नाही, असे इंदू इंसानने या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. राम रहीमविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने या दस्ताऐवजांवर सही केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम रहीमने असे शेकडो दस्ताऐवज तयार केले होते.

Comments
Loading...