fbpx

पोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार !

टीम महाराष्ट्र देशा : उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची असते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे. राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जाते. याच प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने काही बदल केले आहेत. याअगोदर मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा असायची. मात्र आता राज्यसरकारच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षा अगोदर घेतली जाणार आहे. त्यामुळे अभ्यास केला तरच उमेदवारांना शारीरिक चाचणीपर्यंत जाता येईल. ही लेखी परीक्षा आता १०० ऐवजी ५० गुणांची होणार आहे. याबाबत गृहविभागाकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमाचा जीआर लवकरच काढला जाणार आहे.

परीक्षेतील सर्व विषयही नेहमीप्रमाणे सारखेच असतील.मदानी चाचणीची गुणविभागणी पुरुष व महिला संवर्गानुसार खालीलप्रमाणे होते.शारीरिक चाचणी (महिलांसाठी)- धावणे (८०० मीटर) – ३० गुण, धावणे (१०० मीटर) – १० गुण, गोळाफेक –१० गुण, लांब उडी – २५ गुण.शारीरिक चाचणी (पुरुषांसाठी)- धावणे (१६०० मीटर) – ३० गुण., धावणे (१०० मीटर) – १० गुण, गोळाफेक (७.२६० किलो वजन)- १० गुण.मैदानी चाचणीत पूर्वी पुरुष उमेदवारांसाठी पाच, तर महिलांसाठी चार प्रकार होते. आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन आणि महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान ३५ टक्के, राखीव गटासाठी ३३ टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.