‘पोलीस भरती म्हणजे मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम’ ; नितेश राणेंचा सरकारवर प्रहार

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. त्यातच काल तब्बल १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठा आरक्षणासाठीच्या जागा या भरती प्रक्रियेअंतर्गत भरता येणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील अनेक युवकांना याचा फटका बसणार असून सामान्य पदांच्या जागांतूनच सामोरे जावे लागणार आहे. काहीच दिवसांपूर्वी न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असतानाच या पोलीस पदांच्या महाभरतीची आता लगबग का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘राज्यातील एवढी मोठी मेगा म्हणजे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम’ असा घणाघात त्यांनी केला आहे. “राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात..जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??” असा प्रहार त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

पोलीस भरतीवर खासदार संभाजीराजेंनी देखील व्यक्त केली नाराजी!

या वतावरणात भरतीची घोषणा ऐकून दुःखी झाल्याचं त्यांनी सांगितलं. ५८ मोर्चाना सर्वच समाजाचा पाठींबा मिळाला होता. मात्र आता मराठा समाज व्यथित असताना आरक्षण स्थिर करण्याऐवजी अशी घोषणा करणे म्हणजे मराठा समाजाला एक प्रकारे चेतावणी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही भरती पुढच्या टप्प्यात देखील घेतली जाऊ शकते, तर आत्ताच घ्या घ्यायची आहे? असा सवाल देखील राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :