भीमा कोरेगाव हिंसाचार: फादर स्टेन यांच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी झारखंड राज्यातील रांची येथे पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी फादर स्टेन स्वामी याच्या घरी छापा टाकला आहे. तसेच तपास सुरू केला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. पोलिसांनी डिजिटल डिव्हाईस व इतर काही साहित्य हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत बंदी असलेल्या माओवाद्यांचा समावेश असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी यापूर्वी पाच माओ समर्थकांना अटक केली होती. त्यावेळीही रांचीमधील फादर स्टेन याच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामुळेही स्वामी यांची घरी चौकशी केली होती. मात्र त्यावेळी त्यांना अटक केली नव्हती.

कोण आहेत फादर स्टेन स्वामी…

फादर स्टेन स्वामी यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. ते एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते गेल्या वर्षापासून झारखंडमधील आदिवासी भागात काम करत आहेत. त्यांनी पुनर्वसन, भूमी अधिग्रहण या मुद्यांवर मोठा संघर्ष केला आहे.