पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठीच्या वयोमर्यादेत वाढ- चंद्रकांत पाटील

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

खुल्या वर्गासाठी ही वयोमर्यादा 28 वरून 31 करण्यात आली आहे तर मागासवर्गीयांसाठी 31 वरून 34 करण्यात आली असल्याचे निवेदन महसूल मंत्री श्री. पाटील यांनी दिले.