BREAKING : कधी काळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणारा हा नेता आता भाजप सोबत ; घराबाहेर सुरक्षेत वाढ

पटना : आज ( १९ ऑगस्ट ) JD(U) च्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकित नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA मध्ये सामील होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे . पक्षाचे अध्यक्ष आणि बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाच्या विरोधात असणारे शरद यादव यांच्या समर्थकांनी नितीश कुमार यांच्या निवासस्थाना बाहेर जोरदार घोषणाबाजी केली . याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या निवस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

याचवेळी शरद यादव यांनी सुधा भाजपच्या हातात हात घालण्याचा विरोध करण्यासाठी एस .के मेमोरिअल हॉल मध्ये ‘जन आदालत’ बोलावली होती. २३,२४ ऑगस्ट ला होणारी राष्ट्रीय कार्यकारणी बैठक आज ( १९ ऑगस्ट ) ला पटना येथे घेण्यात आली . एकाच दिवशी JD(U) च्या दोन बड्या नेत्यांच्या वेगवेळ्या बैठकी हे सिध्द करत आहेत की आता JD(U) मध्ये उभी फुट पडणे निश्चित आहे.

दरम्यान, देशाच्या राजकारणाला कलाटणी देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘महागठबंधन’ तोडत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली . वास्तविक पाहता राष्ट्रपती निवडणुकीपासूनच नितीश कुमार यांचे भाजप प्रेम काही लपून नव्हते. त्यांनतर अवघ्या काही दिवसांतच नितीश कुमार यांनी लालू यादव यांचा हात सोडत भाजप शी लगट केली आणि मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासातच पुन्हा मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतली .

नितीश कुमार यांचे भाजप सोबत जाणे मात्र JD(U) चे राष्ट्रीय नेते शरद यादव यांना रुचत नसल्याने त्यांनी आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला , हीच योग्य वेळ साधत आणि आपले राजकीय चातुर्य वापरत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्या घरी जाऊन त्यांना NDA मध्ये सामील होण्याचे खुले निमंत्रण दिले होते .