fbpx

महापौरपद निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी श्रीपाद छिंदमला पोलीस संरक्षण

श्रीपाद छिंदम shripad

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी छिंदमला हे संरक्षण देण्यात येणार असून त्याच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी असणार आहे.

१० डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणूक निकालात छिंदमने आश्चर्यकारकरित्या प्रभाग क्रमांक ९ क मधून विजयी झाला आहे. २८ डिसेंबरला होणाऱ्या महापौरपद निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र छिंदम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला लिहिलं होतं.