त्या सहा नगरसेवकांच्या घराला आता पोलीस संरक्षण

मुंबई – मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत शिवसेनेशी घरोबा केल्याने, नाराज झालेल्या मनसे कार्यकर्त्यांकडून काही अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नगरसेकांच्या घरांना आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिलं आहे.

दरम्यान, सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची सुद्धा खात्रीशीर माहिती मिळत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Loading...