सांगलीत सीआयडी पोलीस निरीक्षकाची आत्महत्या ; नैराशेतून आत्महत्या केल्याची चर्चा

सांगली: ऐन दिवाळीच्या दिवशी सांगलीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सीआयडीचे पोलीस निरीक्षक सखाहरी गडदे यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गडदे यांच्या आत्महत्येने पोलीस दलासह संपूर्ण राज्यत एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी त्यांनी आपल्या देवल कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हर मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज येताच नातेवाईक धावले मात्र तोपर्यंत गडदे गतप्राण झाले होते.

गडदे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराशेतून आत्महत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.