‘झिरो पेन्डसी’च्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी घेण्यात आली कार्यशाळा

chandrakant-dalvi-ias-commissioner-of-cooperatives-maharashtra/

पुणे : विधानभवन सभागृहात सकाळी १० वाजता पुणे विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवारी (६ ऑक्टोबर) विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘झिरो पेन्डसी’ कार्यशाळेचे घेण्यात आली.

या एकदिवसीय कार्यशाळेला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी, विभागातील सर्व जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी ‘झिरो पेन्डन्सी’ अभियान  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्याच्या प्रशिक्षणासाठी हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.Loading…
Loading...