पोलीस अधिकाऱ्याला महिला होमगार्डचा मसाज

hydrabad police massaj

हैदराबाद :हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडीओ वरून गुजरातमध्ये राजकारण तापले असताना आता तेलंगणामध्ये एक पोलिस अधिकारी पोलिस स्टेशनमध्येच महिला होमगार्डकडून मसाज करुन घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.आरोपी हा गढवालमधील असिस्टंट सब इन्स्पेक्टर हसन असल्याची माहिती व्हिडिओत एक महिला होमगार्ड खाकी साडी म्हणजे पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तर पोलिस अधिकारी डोळे बंद करुन पहुडलेला आहे. सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.ANI या वृत्तसंस्थेने यासंबधीचं ट्वीट केलं आहे .