बदलीसाठी राजकीय शिफारस करणा-या पोलीस निरीक्षकांविरोधात होणार कारवाई

पोलीस निरीक्षक

मुंबई : बदलीसाठी राजकीय शिफारस करणा-या ४२ पोलीस निरीक्षकांविरोधात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पोलीस निरीक्षकांविरोधात कारवाई करण्याचे संकेत गृह विभागाने दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बदलीसाठी राजकीय शिफारस करणे आता पोलीस अधिका-यांना चांगलेच महाग पडणार आहे.

या संदर्भातील लेखी खुलासा घेतल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांना बदलीचे शिफारसपत्र देणाऱ्यांमध्ये मंत्री विनोद तावडे, गिरीष बापट, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.