दोन गटातील मारहाणीत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जखमी

दौंड/ सचिन आव्हाड : तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तुंबळ मारामारी सुरू झाली होती . यावेळी दगड, काठ्या, लाथा, बुक्क्यांनी मारहाण चालू असताना दोन्ही गटाला वेगळे करीत असताना यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना एकाने दगड फेकुन मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. बंडगर यांना यवत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ३८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी आहे की, (धायगुडेवाडी, बोरीपारधी, ता. दौंड) येथे नजमा मुल्ला व मुन्ना लोंढे यांच्यात झालेल्या भाडंणाचा राग मनात धरून पोलिस ठाण्याच्या आवारात एकमेकांना हाताने लाथाबुक्यानी दगडाने व काठ्यांनी मारहाण करीत होते. यावेळी जमलेल्या जमावास वेगळे करीत असताना जमावाने सरकारी कामात अडथळा आणून जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी जमावाने पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आणि पोलीस हवालदार संकुल आणि गायकवाड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी मुन्ना लोढे याच्या सोबत आलेल्या लोकांंमधील एकाने यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना दगड फेकुन मारला. दगड भुवयीच्या वर लागुन पोलीस निरीक्षक सुरज बंडगर गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी मुन्ना उर्फ सजंय राजेश लोंढे, पद्मिनी आबा कसबे, फुलाबाई राजू लोंढे, विकास वसंत राखपसरे, बाळासाहेब सुरेश राखपसरे, वसंत भाऊसाहेब राखपसरे, संगिता वसंत राखपसरे, अवि सुरेश राखपसरे (रा. फुरसुंगी, ता. हवेली जि. पुणे), सतिश आबा कसबे, छगन मारुती भावे, सोमनाथ राजेंद्र कसबे, नाना उर्फ बाळासाहेब नारायण लोंढे, विठ्ठल राजेश लोंढे, माणिक शिवाजी भाले, प्रमोद दादासो अवचट, सचिन राजेश लोंढे (रा. केडगाव चौफुला, ता. दौंड, जि. पुणे) व इतर अनोळखी ८ ते १० लोक नाव पत्ते माहित नाहीत. तसेच इक्बाल मुबारक शेख, इम्रान शेख (रा. खाटीक गल्ली, ता. दौंड, जि.पुणे) व त्याचे सोबत अन्य दोन आरोपी असे ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.

पोलीस निरीक्षकावर कारवाईसाठी शेवगावमध्ये बंद आंदोलन