भव्य मिरवणूक काढून दिला पोलीस अधिकाऱ्याला निरोप

टीम महाराष्ट्र देशा : शासनाने दिलेली जबाबदारी सक्षमरित्या पार पाडणारे तसेच स्त्री भ्रूण हत्येतील आरोपी सुदाम मुंडे याला गजाआड केलेले माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग हे 31 डिसेंबरला सेवा निवृत्त झाले. याच दिवशी माजलगाव शहरातील पोलीस दलाच्या उपस्थितीत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून या पोलीस अधिकाऱ्याला  निरोप देण्यात आला.

बेग यांनी पोलीस खात्यात 34 वर्ष सेवा केली असून ज्या ज्या ठिकाणी काम केले. तिथे त्यांनी पोलीस खात्याचे नावलौकिक केले. सुदाम मुंडेच्या प्रकरणात बेग यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सहकाऱ्यांशी योग्य पद्धतीने समायोजन करून अनेक कारवाया तडीस नेल्या. मिर्झा बेग हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. मात्र मागच्या बारा वर्षांपासून बीड जिल्ह्यात कार्यरत होते. यामुळे मिर्झा बेग यांच्याबद्दल बीड जिल्ह्यातील लोकांना नेहमीच आपुलकी असायची. म्हणूनच अशा जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याला वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.

You might also like
Comments
Loading...