गडचिरोलीत जवानाला लागली गोळी

नागपूर –  नक्षलविरोधी मोहिमेवर असलेला जवान अन्य एका जवानाच्या बंदुकीतून अचानक सुटलेली गोळी लागल्यामुळे जखमी झाल्याची घटना 16 नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे घडली. सूरज खोब्रागडे असे या जखमी जवानाचे नाव असून तो अहेरी येथील प्राणहिता पोलिसमुख्यालयात कार्यरत होता.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार सूरज खोब्रागडे हा सी-60 पोलिस दलात कार्यरत असून अहेरी तालुक्यातील पातागुडम जंगलात नक्षलविरोधी अभियानासाठी सूरज आपल्या सहका-यांसह पोलिसवाहनातून जात होता. रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांच्या वाहनाने उसळी घेतल्याने एका जवानाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली. ही गोळी सूरजच्या पायातून आरपार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान त्याला हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. दरम्यान जखमी जवानाची प्रकृती स्थीर असल्याचे त्याच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...