नेवासा तालुक्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

crime

नेवासा : नेवासा तालुक्‍यातील तरवडी गावात एका घरात सुरु असलेल्या जुगारावर छापा टाकून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 7 हजार 490 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
तरवडी गावात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती. रविवारी दुपारी एकच्या सुमारास तरवडी येथील अजित रामचंद्र पाटील यांच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. रफिक शेख (कुकाणा), निवृत्ती खाटिक (सुलतानपूर), योगेश खाटिक (पाथरवाला), सय्यद हमीद (कुकाणा), अजित पाटील (तरवडी), नवनाथ थोरे(पाथरवाला) यांना यावेळी अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे, पोलीस उपनिरीक्षक भिंगारे, संग्राम जाधव, प्रवीण दैनिवाळ, बुचकुल, पोलीस नाईक तुपे यांच्या पथकाने कारवाई केली.