fbpx

‘भारत बंद’ : पोलिसांनी संजय निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरातून घेतलं ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा – पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. दरम्यान आंदोलन सुरु होण्याआधीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी संजय निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत.

Bharat Bandh Live Updates:
– अंधेरीत डीएन नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखली
– डोंबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियनकडून रिक्षा बंद
– जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
– कांदिवली चारकोपमध्ये अद्याप स्थिती सामान्य, बंदचा परिणाम नाही
– कल्याणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी; पश्चिमेकडील शिवाजी चौकात आंदोलन; मनसेचाही सहभाग

-गुजरातमध्ये हिंसक वळण, महामार्गावर टायर जाळले

-भारत बंदमुळे आज सकाळी असणाऱ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी

-मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना आंदोलन सुरू होण्यापूर्वीच घेतले ताब्यात

-पुण्यात भारत बंदला हिंसक वळण, पीएमटी बसवर मनसेकडून दगडफेक

-काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये बिहारमधील महामार्ग तीसवर आंदोलन, महामार्गावर वाहनांच्या रांगा