तब्बल १५ वर्षांपासून दिल्लीत राहत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पोलिसांनी केली अटक

तब्बल १५ वर्षांपासून दिल्लीत राहत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील लक्ष्मी नगरमधून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला आज अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दहशतवादी गेल्या १५ वर्षांपासून दिल्लीत राहत होता आणि तो सतत त्याच्या पाकिस्तानी म्होरक्याच्यां संपर्कात होता अशी देखील माहिती समोर आली आहे.

मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अशरफ अली मौलाना म्हणून भारतात राहत होता. तो पाकिस्तानमध्ये बसलेल्या सूत्रधारांना माहिती पाठवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासादरम्यान, त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. त्याने ही शस्त्रे वाळूमध्ये लपवून ठेवली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सोमवारी ही कारवाई केली.

पोलीस उपायुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा मोहम्मद अशरफ उर्फ अली याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. तो भारतीय नागरिक म्हणून दिल्लीत राहत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अली दहशतवादी संघटना आयएसआयच्या संपर्कात होता. अटक करण्यात आलेला दहशतवादी काही दिवस काश्मीरमध्ये राहिल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, पोलीस या दाव्याची पडताळणी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदींखाली अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या