कोरेगाव भीमा दंगल पोलिसांचे अपयश : रामदास आठवले

ramdas aathvale

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हि पूर्वनिजोयित होती. आणि काही प्रमाणत प्रमाणात पोलिसांचे अपयश होते. असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे दंगलीनंतर संपूर्ण राज्यात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बंद पाडण्यात आला होता. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्यानंतर आता आज पत्रकार परिषद घेऊन रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा प्रकरण म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. तसेच जिग्नेश मेवाणीला चांगला नेता व्हायचे असेल तर त्याने उलटसुलट भाषण करू नये असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच या संपूर्ण हिंसाचारात ९ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होणार नाही. दलितांना आपले मित्र मानून काम करा असाही सल्ला आठवले यांनी दिला. कोरेगाव भीमाची दंगल म्हणजे काही प्रमाणात पोलिसांचे अपयश होते असेही त्यांनी म्हटले आहे.