‘वाहन चोरांपुढे पोलिसांचे काही चालेना’, वाहन चोऱ्या सुरूच

औरंगाबाद : शहरात वाहन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. वाहन चोरी थांवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून होत असताना, देखील त्यांचे काही चालत नसल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. दिवसाघडी दोन ते तीन दुचाकी चोरीला जात आहे. पोलिसांना चोरांवर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या आठ दिवसातच शहरातून तब्बल २४ वाहन चोरीला गेले आहे.

शहरात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. पोलीस आयुक्त यांनी अश्या घटनांवर आळा बसविण्यासाठी विशेष पथक स्थापन केले परंतु त्यांच्या कडून देखील निराशेचा सूर दिसत आहे. गुन्हे शाखेकडून काही प्रमाणात कारवाई करण्यात आली परंतु त्यांचा आकडा देखील फार काही दिसला दायक नाही आहे. अनेक सर्व सामन्यांसाठी वाहन हे उपजीविकेचे साधन आहे. तेच चोरी गेल्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यसाठी अडचण निर्माण होत आहे.

शहरातून आठ दिवसात तब्बल २४ दुचाक्या चोरीला गेल्या, १५ तारखेला १, १६ तारखेला ३, १७ तारखेला २, १८ तारखेला ५, १९ तारखेला २, २० तारखेला ३, २१ तारखेला ५, २२ तारखेला ३, अश्या दुचाकी पोलीस आयुक्तालय हद्दीतून चोरीला गेल्या आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

महत्वाच्या बातम्या