खुनानंतर पुरावे नष्ट केल्यामुळे पोलीस अटकेत

सोलापूर : मंगळवेढा जतयेथील एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टाकून खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दत्ता गोरख भोसले यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी : एक महिन्यापूर्वी आषाढी वारीच्या काळात वायफळ (ता. जत) येथील नितीन अर्जुन यादव (रा. वायफळ) याचा अज्ञात व्यक्तीने खून करून त्याचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव – बाभूळगाव शिवारात फेकून दिला होता. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंतराव भोये यांनी मोबाइल टॉवर लोकेशनवरून तपास केला.