कानडी नाट्य : मनधरणी करण्यासाठी आलेल्या डी.के शिवकुमारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा : कानडी नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र ‘काँग्रेस नेत्यांनी डी.के शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. त्यामुळे आता डीके शिवकुमार आणि अन्य कॉंग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेते डी.के शिवकुमार मुंबई येथे आले होते. मात्र ‘काँग्रेस नेते डी.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,’ असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहील्याने डी.के शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी अडवले होते. कॉंग्रेसच्या आमदारांना भेटू दिले नाही. यावेळी हॉटेल बाहेर गोधळ झाला. त्यानंतर पोलिसांनी मिलिंद देवरा आणि डी.के शिवकुमार यांना ताब्यात घेतले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत