शरद पवारांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शनिवारी बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र अद्याप पवारांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये. सीपीएड मैदानावर उद्या शनिवारी शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सभेचं आयोजन करण्यात आलंय.

या सभेला प्राध्यापक एनडी पाटील हे देखील उद्याच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.