प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Grandson of Dr. BR Ambedkar, Prakash Ambedkar. (File Photo: IANS)

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी २६ मार्चला विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार होता मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

Loading...

कोरेगाव-भीमा हिंसाचार संभाजी भिडे गुरूजींमुळे उसळल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याप्रकरणी जबाबदार असलेले संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती. एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून अजून भिडे गुरूजींना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भिडे गुरूजींच्या अटकेची मागणी केली होती. भिडे गुरूजींना अटक न केल्यास दि. २६ मार्च रोजी एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या एल्गार मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली. परंतु, पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारली असली तरी आझाद मैदानात आंदोलन करण्यास अनुमती दिली आहे.

भिडे यांना तत्काळ अटक करावी, त्याबाबत कारवाई होत नसल्याने सोमवारी आयोजित केलेल्या मोर्चात मोठय़ा संख्येने आंबेडकरी अनुयायी तसेच कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू होती मात्र ऐनवेळी सरकारने मोर्चाला परवानगी नाकारली आहे.आमची अपेक्षा होती एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडे अटक होतील, पण शासनाकडून हालचाल नाही. सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत बोलताना केली आहे.Loading…


Loading…

Loading...