चित्रपट गृहात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी दाखवला इंगा

टीम महाराष्ट्र देशा : मनोरंजनाचे साधन असलेल्या चित्रपट गृहातही आता जोडप्यांचे अश्लील चाळे पाहायला मिळत आहेत. धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे पोलिसांच्या दामिनी पथकाने चित्रपटगृहात छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या काही जोडप्यांना रंगे हात पकडले आहे.

चित्रपटगृह हे मनोरंजनाचे साधन आहे. बऱ्याचवेळी चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब येत असते, परंतु सध्या चित्रपट गृहात जोडप्यांचे अश्लील चाळे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब चित्रपट गृहात येण्याआधी विचार करत आहेत.

याचदरम्यान धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. ज्योती चित्रपटगृहातील बॉक्समध्ये दोनशे रुपये प्रतितास याप्रमाणे पैसे घेऊन जोडप्यांना अश्लील चाळे करण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात येत होती. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना कळली त्यावेळी पोलिसांच्या दामिनी पथकाने यावर कारवाई केली.

दामिनी पथकातील एक माझी ऑफिसर आणि एक पुरुष ऑफिसर हे सिव्हिल ड्रेस मध्ये नकली जोडपं बनून चित्रपटगृहात गेले. चित्रपट गृहात गेल्यानंतर मिळालेल्या माहितीची शहानिशा केली. त्यावेळी चित्रपट गृहातील बॉक्समध्ये काही जोडपी अश्लील चाळे करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. दरम्यान त्यांनी इतर साथीदारांना कळवत चित्रपट गृहात छापा टाकला. पोलिसांनी ८ जोडप्यांना ताब्यात घेतले होते. परंतु गर्दीचा फायदा घेत सहाजन पसार झाले. पोलिसांनी सध्या १० जणांना अटक केली आहे. याचबरोबर ज्योती चित्रपटगृहावर कारवाई करण्यात येत आहे.