करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना पोलिस कोठडी

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना करमाळा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी झालेल्या भांडणातील दाखल गुन्हात जगताप संशयित आरोपी आहेत.

Loading...

करमाळा बाजार समितीच्या निवडीमध्ये हाणामारी होऊन यात करमाळ्यातील राष्ट्रवादीचे नेते दिगविजय बागल आणि नूतन सभापती शिवाजी बंडगर हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप, त्यांचा मुलगा आणि करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांच्यासह इतर ९ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिव्हॉल्व्हरने मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याचा जगताप यांच्यावर आरोप आहे.

अटकपूर्व जामीन न मिळाल्याने ते स्वतः हून करमाळा पोलिसात हजर झाले आहेत. जयवंतराव जगताप हे पोलिस स्टेशनला हजर होणार असल्याने सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळा पोलिस स्टेशन परिसरात गर्दी केली होती. तसेच आज जगताप हे पोलिसात हजर होत असल्याने त्यांच्या समर्थकांनी करमाळा येथे कडकडीत बंद ठेवला आहे. जगताप यांच्या अटकेच्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...