गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्याला पोलिस कोठडी

औरंगाबाद : गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्या  फ्लॅटवर छापा मारुन गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून ५४ हजार ६६८ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी दि.३० रात्री गारखेडा परिसरात करण्यात आली.

संतोष खुशालचंद बडजाते (४२, रा. जय सेरेनिटी अपार्ट. शांतीनाथ कॉ. हा. सो गारखेडा) आणि हर्षल पाटणी (रा. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी) अशी आरोपींची नावे असून त्यांना सोमवार दि. ३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे/तांबडे यांनी १ मे रोजी दिले.

प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी (३५) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, ३० एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जारवाल यांना माहिती मिळाली की, गारखेडा परिसरातील एका फ्लॅटमध्ये गुटख्याचा साठा करण्यात आला आहे. त्यानूसार अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करुन संतोष बडजाते याच्या फ्लॅटवर छापा मारुन ५४ हजार ६६८ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. त्याची चौकशी केली असता त्याने सदरील गुटखा हर्षल पाटणी याच्याकडून आणल्याची कबुली दिली.त्यानूसार पोलिसांनी संतोष बडजाते याला अटक केली. प्रकरणात जवाहर नगर पोलीस ठाण्;यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी आरोपीचा साथीदार हर्षल पाटणीला अटक करणे आहे. आरोपी गुटखा कोणाला विक्री करणार होता याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

महत्वाच्या बातम्या