संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल; तर परिणाम भोगायला तयार रहा मनसेचा इशारा

sanjay nirupam & raj thackeray

टीम महाराष्ट्र देशा: विनापरवानगी सभा घेणे तसेच भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरुपम यांनी फेरीवाल्यांना भडकावल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. यानंतर आता मुंबई पोलिसांनी संजय निरुपम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान मनसे विभाग अध्यक्षांवर हल्याप्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मनसे विभाग अध्यक्षावर झालेल्या मारहाणीनंतर आता मनसेदेखील आक्रमक झाली असून संजय निरुपम यांनी काल फेरीवाल्यांना भडकवण्याची कृती केलीत त्याचे परिणाम भोगायला तयार रहा असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.