महिला पत्रकाराची बदनामी; आमदार जिग्नेश मेवानी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

mewani

पुणे: पुण्यातील महिला पत्रकाराच्या फोटोचा गैरवापर करत अपमानास्पद लिखाण करणे, तसेच हे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्या प्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील महिला पत्रकाराने मेवानी यांच्याविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘जिग्नेश मेवानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व श्री श्री रविशंकर यांच्या फोटोसोबत संबंधित महिलेचे फोटो क्रॉपकरत हिंदी चित्रपट ‘ओ माय गॉड’ मधील फोटोसोबत जोडत बदनामीकारक मजकूर लिहिला आहे. हे क्रॉप केलेलं फोटो मेवानी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून पोस्ट केले आहेत.

मेवानी यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट केल्यानंतर आणखीन काही व्यक्तींनी हे फोटो फेसबुकवर शेअर केले. यासर्व प्रकारामुळे संबंधित महिला पत्रकाराच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच तक्रारीमध्ये सांगण्यात आल आहे.