जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल तर मुंबईत सर्च वॉरंट

जिग्नेश मेवणी आणि उमर खालिदवर चिथावणीखोर भाषण व परिसरात अशांतता निर्माण केल्याचा आरोप आहे

पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणानंतर अखेर आज गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयूमधील विद्यार्थी उमर खालीद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गौतमराव बिक्कड याच्या तक्रारीनंतर आमदार मेवानी यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३१ डिसेंबर रोजी जिग्नेश मेवणी व उमर खालीद यांनी शनिवारवाडा तेथे एल्गार परिषद मध्ये दोन समाजाच्या भावना भडकवणारे भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार मेवानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या भाषणामुळे भीमा कोरेगाव परिसरात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप आमदार मेवानी यांच्यावर करण्यात आला आहे. जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांच्यावर १५३ अ आणि ५०५ या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला बिक्कड यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार वाड्यावर एल्गार परिषद झाली होती. त्यामुळे ही तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला.

You might also like
Comments
Loading...