fbpx

राज ठाकरेंच्या पुलवामाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात चेंबूरमध्ये तक्रार दाखल

टीम महाराष्ट्र देशा : देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त केले होते. आता या वक्तव्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात केलेल्या वक्तव्याविरोधात जेष्ठ पत्रकार आणि वकील एस. बाल. कृष्णन यांनी तक्रार दाखल केली आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार एस. बाल. कृष्णन यांनी तक्रार अर्ज दाखल केला.