नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात पोलिस तक्रार

nagpur-university_1

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याविरोधात जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख सुनिल मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परीक्षा नियंत्रक पदावर असताना डॉ. काणे यांनी स्वत:च्या मुलीला नियमबाह्य पद्धतीने मदत केली. तसेच त्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून प्रकरणाचे पुरावे नष्ट केले, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे.

या संदर्भात सुनील मिश्रा यांनी नागपुरातील सीताबर्डी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक म्हणून डॉ. काणे यांच्याकडे तत्कालिन विद्यापीठ कायद्यानुसार मॉडरेटरने दिलेले 3 प्रश्न संच आपल्या ताब्यात घेणे, त्यांना सुरक्षितपणे ठेवणे, एका प्रश्नपत्राची प्रिंटींगला पाठविण्यासाठी निवड करणे, गोपनीय ठिकाणी प्रिंटींगला पाठविणे इत्यादी गोपनीय कामांची जबाबदारी होती. डॉ. काणे यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची जबाबदारी असताना त्यांची मुलगी नागपुरातील रामदेव बाबा-कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. विद्यापीठाच्या परीक्षेशी संबंधीतांच्या कुटुंबातील कुणी विद्यार्थी असल्यास त्याची माहिती विद्यापीठाला कळवणे बंधनकारक असते. मात्र डॉ.काणे यांनी याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली नाही. तसेच परीक्षेत कोणते प्रश्न येणार याची माहिती आपल्या मुलीला दिली. सोबतच 31 आॅगस्ट 2017 रोजी मुलीच्या उत्तरपत्रिकेसह मूळ कागदपत्रे ताब्यात घेण्याची विनंती केली असता परीक्षा विभागातील अधिका-यांनी ते पुरावे नष्ट केले, असा आरोप सुनिल मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

Loading...

पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विद्यापीठाने पोलीस तक्रार केली नाही. विद्यापीठात 1999 साली असेच भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते. त्यानुसार डॉ.काणे, त्यांची मुलगी व पुरावे नष्ट करण्यात सहभागी असलेल्या अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, असेही मिश्रा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नाहक बदनामीचा प्रयत्न – डॉ. काणेयासंदर्भात कुलगुरू डॉ. काणे यांना संपर्क केला असता त्यांनी मिश्रा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. तब्बल 5 वर्षांनी अशा प्रकारची तक्रार करणे हा नाहक बदनामी करण्याचा प्रकार आहे. परीक्षा नियंत्रक असताना आपण नियमांच्या अंतर्गत राहूनच कार्य केले होते. अधिका-यांच्या मुलांनी विद्यापीठात शिकायचेचा नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच यासंदर्भात लवकर योग्य ती कायदेशीर पावले उचलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल