लातूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

लातूर: वेगवेगळ्या लोकप्रिय कामगिरीमुळे लातूरचे जिल्हाधिकारी असणारे आयएएस अधिकारी जी.श्रीकांत हे कायम चर्चेत असतात. मात्र, सध्या श्रीकांत हे एक नवीनच वादात सापडले आहेत. लातूर शहरातील गंज गोलाई परिसरात काल महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी पुढाकार घेत या भागातील अतिक्रमण हटवले.

यात जवळपास 400 पेक्षा अधिक व्यवसायिक तसेच अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. मात्र संबंधित ठिकाणी न्यायालयाचा मनाई आदेश असताना व टपरी धारकाचे पूनर्वसन केले नाही. म्हणून अतिक्रमण हटाव मधील व्यावसायिकानी लातूरच्या गांधी चौक पोलीसात रितसर तक्रार दाखल केली आहे

आयएएस अधिकारी असणारे जी श्रीकांत हे त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर लावण्यात आलेल्या पाटीमुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान या तक्रारी संदर्भात पोलीसांकडे विचारणा केली असता केवळ तक्रार अर्ज स्विकारण्यात आल्याचे सांगितले आहे.

 

You might also like
Comments
Loading...