पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी हे रस्ते असणार बंद

पुणे:- उद्या होणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश भक्त लोखोंच्या संख्येने पुण्यात दाखल झाले आहेत. राज्यातुनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून भक्त पुण्यात आले आहेत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीकडे संपूर्ण जागाच लक्ष लागेल असत. मोठ्या संखेत भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात त्यामुळे या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे रस्ते

शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, स्वारगेट),

लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक, नाना पेठ ते टिळक चौक, अलका टॉकीज चौक),

बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक),

बाजीराव रस्ता (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज, शनिवारवाडा),

कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कोपरा, शनिपार),

गणेश रस्ता (दारुवाला पूल ते जिजामाता चौक),

गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक),

टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक),

शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक),

जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक),

कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक),

फग्र्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फग्र्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार),

भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक ते नटराज चौक),

पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक),

सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक),

प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक).

दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मी रस्ता तसेच टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणूक मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.