अमरावती : अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदीय विशेषाधिकार समितीकडे तक्रार दाखल केली होती.
ADVERTISEMENT
या तक्रारीवरून आता राज्यातील चार बड्या अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. त्यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.