राजासिंह यांनी स्वत:चं डोक्यात दगड घालून घेतला – पोलिसांचा पलटवार

टीम महाराष्ट्र देशा : तेलंगणातील एकमेव भाजपा आमदार आणि हैदराबादच्या घोशामहल मतदारसंघाचे टी राजासिंह हे पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाले असल्याचे वृत्त असतानाचं, राजा सिंह यांनी स्वत:चं डोक्यात दगड घालून घेतला असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.

तेलंगणातील एकमेव भाजपा आमदार आणि हैदराबादच्या घोशामहल मतदारसंघाचे टी राजासिंह हे पोलिसांच्या मारहाणीत किरकोळ जखमी झाले आहेत. वीरांगना राणी अवंतीबाई यांचा पुतळा बदलण्यासाठी गेले असता, जमावाची अडवणूक करताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये आमदार राजासिंह जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करत मलमपट्टी करण्यात आली आहे.

Loading...

जुम्मेरत बाजार येथील राणी अवंतीबाई यांचा पुतळा गेल्या कित्येक वर्षांमुळे अस्वच्छ आणि विद्रुप अवस्थेत होता. त्यामुळे तो पुतळा हटविण्यासाठी आम्ही गेलो असता, तेलंगणा पोलिसांनी माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याच टी. राजासिंग यांनी म्हटले आहे. टी राजासिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली . तसेच, पोलिसांकडून मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचंही राजासिंग यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटलं आहे.

दरम्यान, राजसिंह यांच्या आरोपावर पोलिसांनी पलटवार केला आहे. राजा सिंह यांनी स्वत:चं डोक्यात दगड घालून घेतला असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. पोलिसांच्या या पलटवाराला राजसिंह काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी