बीड : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना मोफत घरे देता येणार नाही असे स्पष्ट केलंय. आव्हाडांच्या भूमिकेनंतर आता पोलीस बॉईज संघटना आक्रमक झालीय. पोलीस कुटुंबियांच्या अनेक पिढ्या बीडीडी चाळीत वास्तव्यास आहेत. असं असताना हक्काची जागा असून देखील 50 लाख रुपये भरायचे कुठून असा प्रश्न पोलीस बॉईज संघटनेने उपस्थित केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे स्पष्टीकरण देऊन एक प्रकारे पोलिसांची थट्टाच केलीय. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरात पोलिसांची मुलं आंदोलन करतील असा इशारा राहुल दुबाले यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
बीडीडी चाळीत सुमारे दोन हजार ९०० घरे ही पोलीस सेवा निवासस्थाने आहेत. यापैकी ७०० पोलीस निवासस्थाने ही बीडीडी प्रकल्पात असतील. उरलेली २२०० घरे माहिम, वरळी ते दादर या परिसरात पोलीस सेवा वसाहतीसाठी दिली जातील, अशी माहिती मंत्री आव्हाड यांनी काल दिली.
बीडीडी परिसरात किमान एक ते दीड कोटी रुपये इतका दर असताना विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयांना घरे त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही आव्हाड यांनी सांगितले होते. यावर आता 50 लाख रुपये भरायचे कुठून असा प्रश्न पोलीस बॉईज संघटनेने उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या –