पोलीस असल्याची बतावणी करणा-या नाशिकच्या दोन भामटयांना औरंगाबादेत अटक

टीम महाराष्ट्र देशा – पोलीस असल्याची बतावणी करून शेतक-याची अंगझडती घेण्याचा प्रयत्न करणा-या दोन नाशिकच्या भामटयांना जनतेच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले. रियाज अहमद कलीम अहेमद (30,रा.आशानगर, मालेगाव, जि.नाशिक) आणि फैय्याज अहेमद कलमी अहेमद (35,रा.सलीमनगर, मालेगाव, जि.नाशिक) अशी अटकेतील तोतया पोलिसांची नावे आहेत.योगेश विनायक पायगव्हाण (रा. आळंद, ता. फुलंब्री) हे सकाळी रिक्षाने महावीर चौक मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे पायी जाऊ लागले.

यावेळी आरोपींनी योगेशला गाठले आणि आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. तु मालकाचे पैसे घेऊन पळून जात असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे,असे म्हणाले. यावेळी एका जणाने त्यांचा हात पकडून त्यांना रस्त्याच्या कडेला घेऊन गेला तर दुसरा खिशात हात घालून झडती घेऊ लागला. यावेळी योगेश यांनी त्यांना तो शेतकरी असल्याचे सांगून आधारकार्ड दाखविले. तेव्हा एक जण हात पकडून एकांतात नेऊ लागला. यावेळी योगेश यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली असता तेथे असलेल्या साधया वेशातील पोलीस आणि नागरीकांनी योगेशला मदत केली.आणि त्या तोतया पोलिसांना पकडले. दोन्ही आरोपींविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली.

You might also like
Comments
Loading...