पुण्यामध्ये मुकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे: पुण्यातील कोथरूडमध्ये 16 वर्षीय मुकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पिडीत मुलीचे वडील हे अंध आहेत. आरोपीने मार्च 2017 पासून पिडीतेवर वेळोवेळी अत्याचार केल्याच समोर आल आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे. वडिलांच्या फिर्यादीनुसार सहारूल इस्लाम अब्दुल वाहीद (वय-26, रा.आदर्श चौक, केळेवाडी, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी हा पिडीत मुलीच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजमध्ये कामाला आहे. त्याने पिडीत मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या संबंधातून ती गर्भवती झाली असता तीला गर्भपात करण्यास भाग पाडले. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सह पोलीस निरीक्षक पंचीभाई अधिक तपास करीत आहेत.