नागपूरमध्ये रास्ता रोको करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे पोलिसांच्या ताब्यात

सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी अटक केली. नागपूर विमानतळ रोडवर आज राष्ट्रवादीच्या वतीने हे आंदोलन केले जात होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरात विशेषता विदर्भामध्ये राष्ट्रवादीकडून हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. याचदरम्यान आज नागपूरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले जात होते. दरम्यान पोलिसांनी सुळे यांच्यासह इतर नेत्यांना, कार्यकर्त्याना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.