fbpx

मोदींच्या रॅलीजवळ ‘मोदी पकोडा’ विकणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक

टीम महाराष्ट्र देशा :  रोजगार नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘पकोडे’ विकत आंदोलन करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना अटक केल्याची घटना चंदीगड येथे घडली आहे. हे विद्यार्थी नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन करत होते.

गेल्या वर्षी रोजगाराच्या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी ‘पकोडा विकणं हादेखील रोजगाराचाच भाग असतो’, असं विधान केले होते याचा निषेध हे विद्यार्थी करत होते. पुढे बोलताना विद्यार्थ्यांनी ‘पकोडा योजने’च्या अंतर्गत आम्हाला नवा रोजगार देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, शिक्षित तरुणांना पकोडा विकताना किती छान वाटतं, हे पंतप्रधानांना समजावं हा आमचा उद्देश असल्याचं विध्यार्थी म्हणाले.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा संपल्यानंतर करण्यात आली अशी माहिती आहे.