पतंजलीच्या पिठात भेसळ करणा-या दोघांना अटक

arrest

ठाणे : रेशनिंगच्या काळ्या बाजारातील गव्हाचे पीठ मुदतबाह्य पतंजलीच्या पिठात भेसळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून ३० टन भेसळ केलेले गव्हाचे पीठ जप्त केले आहे. रमेश लक्ष्मीकुमार शहा , प्रेमगंगाराम यादव  या दोघांना अटक करण्यात आली आहे.

रमेश शहा हा व्यापारी आहे. रमेशने अन्न आणि औषध प्रशासनाकडून २ महिन्यांपूर्वी परवानगी घेऊन भिवंडीजवळ अंजूर-अलीमघर रोडवरील एका गोदामात लक्ष्मीकुमार फुड ट्रेडिंग नावाने फ्लोअरमील सुरू केली होती.

या फ्लोअरमीलमध्ये तो हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील गरीबांसाठी वितरित होणारा स्वस्त धान्य योजनेतील गहू काळ्या बाजारातून आणून त्याचे फ्लोअर मीलमध्ये पीठ तयार करत होता. त्यानंतर या पिठात पतंजली कंपनीचे मुदत संपलेले पीठ भेसळ करून ते राजश्री गोल्ड आणि रॉयल अॅग्रो या ब्रॅण्डने पॅकिंग करून बाजारात विकत होता.